पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या अनेक प्रश्नांना मिळाला मार्ग

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या अनेक प्रश्नांना मिळाला मार्ग

 

सिंधुदुर्गनगरी


 

     जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.अनेक रखडलेली प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली, तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या. पालकमंत्री यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सायंकाळी ३ ते ७ एवढा वेळ जनतेसाठी ठेवला होता. यावेळी जनतेची प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी झालेली होती. महावितरण विभागातील कंत्राटी भरती, आरोग्य सेवक, कंत्राटी सफाई कर्मचारी, 108 टोल फ्री रुग्णवाहिका चालक, निवृत्त शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न घेऊन शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटले. राणे यांनी काही प्रकरणे जाग्यावरच मार्गी लावली, तर काहींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे निर्देश दिले.