विविध उपक्रमांनी साजरा होणार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा होणार आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील एकूण १४ मंडलात संपन्न होणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा है अभियान जोरदार सुरु आहे. या अभियानाची सुरवात राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर २०२५ रोजी झाली. या अभियानाचा समारोप २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती यादिवशी होणार आहे. या अभियानानिमीत्त जिल्ह्यात विविध सेवाभावी कार्यक्रम सुरु आहेत. दरम्यान २० सप्टेंबर २०२५ रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साहामध्ये संपूर्ण जिल्ह्याभरात भाजपाच्या वतीने संपन्न होणार आहे. यानिमित्ताने आ. चव्हाण यांच्या अपेक्षित सेवेला समर्पित असे उपक्रम हाती घेतलेले आहेत.रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि आर्थिक सहयोगातुन जिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्रात टेली मेडिसिन सुविधा गेली दोन वर्षे सुरू आहे. या सर्व केंद्रांवर शनिवारी आरोग्य शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेले आहे. भाजपा पदाधिकारी विशाल परब यांच्या सौजन्याने फिरता दवाखाना सावंतवाडी विधानसभेमध्ये ठिकठीकाणी जाऊन रुग्णांची तपासणी करणार आहे. तसेच भाजपाच्या वतीने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथील पदाधिकारी यांनी केले आहे. वेंगुर्ला भाजपा तुळस विभाग आणि युवा मोर्चा यांच्यावतीने राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक मंडलामध्ये अनेक सेवाभावी, स्वच्छता कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये रुग्णांना साहित्य वाटप, फळवाटप इत्यादी उपक्रम होणार आहेत.
असे होणार कार्यक्रम
कणकवली शहर असलदे वृद्धाश्रम येथे जीवनावश्यक वस्तु वाटप
कणकवली ग्रामीण प्रा. आ. केंद्र फळवाटप व कलमठ शाळा खाऊ वाटप
देवगड - देवगड समुद्र किनारा स्वच्छता अभियान व क्षयरोगींना जीवनावश्यक वस्तु वाटप पडेल - विजयदुर्ग किल्ला परिसर स्वच्छता अभियान
वैभववाडी- दत्तमंदिर अभिषेक व उंबर्डे प्रा. रुग्णालय फळवाटप
कुडाळ - वाडोस येथे रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर, नाग्या महादू कातकरी वसतिगृह आणि अपंग पुनर्वसन केंद्र मोरे येथे चादर वाटप, दत्त मंदिर माणगाव येथे 10 मोठ्या बैठका (चटा) वितरण, कुडाळ शहर मधील 1000 प्राथमिक शाळा विध्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप, वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महाआरोग्य शिबीर
ओरोस - अणाव वृद्धाश्रम व कातकरी मुले जीवनावश्यक वस्तु वाटप
मालवण शहर - मेडिकल हेल्थ चेकअप व फ्री मेडिसन कॅम्प आयोजन
मालवण ग्रामीण भरतगड किल्ला स्वच्छता अभियान, सिलिंडर गॅस काळजी घेणेबाबत मार्गदर्शन, सुरक्षा किट, केवायसी अपडेट सावंतवाडी शहर - सावंतवाडी रुग्णालय फळवाटप
बांदा - इन्सुली २२६ शाळकरी मुले कल्पवृक्ष वाटप, रोनापाल वसतिगृह साहित्य वितरण आंबोली- माडखोल रक्तदान शिबीर वेंगुर्ला - सागरी किनारपट्टी स्वच्छता, रेडी आरोग्यकेंद्रात आरोग्य शिबीर
दोडामार्ग - पंतप्रधान सुरक्षा विमा अंतर्गत १००० लोकांचा विमा करणार