कुडाळ एसआरएम महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा संपन्न

कुडाळ एसआरएम महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा संपन्न

 

कुडाळ 

 

        मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी जिल्हास्तरीय "आविष्कार" कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी भूषविले. यावेळी डॉ. सुनील पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठ विकास विभागाच्या ओ. एस. डी. डॉ. मीनाक्षी गुरव, डॉ. सुनीता शैलजा आणि डॉ. रूपा राव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्प सादरीकरण, पीपीटी तयार करणे, गटचर्चा आणि संशोधन प्रकल्प तयार करून त्याचे सादरीकरण करणे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध १४ महाविद्यालयातील ४३ विद्यार्थी प्रतिनिधी आणि २४ प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले, तर डॉ. कॅप्टन एस. टी. आवटे यांनी आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. प्रमोद जमदाडे, तसेच प्रा. भावेश चव्हाण, डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. नागेश काळे, डॉ. रविंद्र ठाकूर, प्रा. राहुल देशमुख, प्रा. प्रणव तेंडोलकर, प्रा. संतोष चौगुले, प्रा. खेमराज कुबल, प्रथमेश दळवी, मंदार कोरगावकर, श्याम दाभोलकर आणि अक्षय परब यांनी सहकार्य केले.