राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात पाटकर हायस्कूलची ‘मिस्टर ॲडम’ नाटिका द्वितीय.

राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात पाटकर हायस्कूलची ‘मिस्टर ॲडम’ नाटिका द्वितीय.

वेंगुर्ला.

   तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा ७ ऑगस्ट रोजी राय.रा.धो.खानोलकर हायस्कूल मठ येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत रा.कृ पाटकर हायस्कूल वेंगुर्ला या प्रशालेच्या विद्यार्थ्यानी "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज" या विषयावर सादर केलेल्या मिस्टर ॲडम या विज्ञान नाटीकेस व्दितीय क्रमांक प्राप्त झाला. याचे लेखन, संयोजन, विज्ञान शिक्षिका श्रीम.जाधव एस.एस. मॅडम यांनी तर दिग्दर्शन मा.मुख्याध्यापक सोकटे सर यांनी केले. 
   या नाटीकेमध्ये विद्यार्थी भार्गवराम ओगले, प्रथम बेस्ता, संकेत परुळेकर, मकरंद वेंगुर्लेकर, प्रिती दास, दुर्वा गांवकर, निधी वेंगुर्लेकर, भूषण बांदवलकर, प्रविण मानवर, या सहभागी विद्यार्थ्यांचे वेंगुर्ला एज्यू.सोसायटी, मुख्याध्यापक आणि श्रीम. मांजरेकर यांनी अभिनंदन केले.यासाठी श्रीम. मांजरेकर, सौ.खरात, श्री.पेडणेक, श्री. ठाकूर, सौ.पिळणकर, श्री.बागुल, श्री पोटफोडे आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले.