समीर नलावडे मित्रमंडळाची दिवाळी बाजार संकल्पना स्तुत्य : आम.नितेश राणे. कणकवलीत दिवाळी बाजाराचा शुभारंभ.

समीर नलावडे मित्रमंडळाची दिवाळी बाजार संकल्पना स्तुत्य : आम.नितेश राणे.  कणकवलीत दिवाळी बाजाराचा शुभारंभ.

कणकवली.

  दिवाळीसणाच्या खरेदीसाठी मुंबई- पुण्यासह महानगरांमध्ये जाणाऱ्या कणकवलीवासीयांना आता दिवाळी बाजारामुळे विविध वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे .समीर नलावडे मित्रमंडळाची दिवाळी बाजार ही आगळीवेगळी संकल्पना आहे. समीर नलावडे मित्रमंडळाचे शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम सुरु असून हे सर्व उपक्रम स्तुत्य आहेत, असे कौतुकोद्गार आम.नितेश राणे यांनी काढले.
    दिवाळीनिमित्त समीर नलावडे मित्रमंडळातर्फे येथील उड्डाणपुलाखाली जागेत दिवाळी बाजार भरवण्यात आला आहे. दिवाळी बाजाराचे हे तिसरे वर्ष आहे. याचा शुभारंभ आम. नितेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, अजय उर्फ बंडू गांगण, अभिजीत मुसळे, माजी नगरसेविका कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, महेश सावंत, अभय राणे, उद्योजक राजू गवाणकर, भाजपच्या सोशल मीडिया टीमचे प्रदेश सदस्य समीर प्रभूगावकर, भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्राची कर्पे, साक्षी वाळके, संजना सदडेकर, संजीवनी पवार, गितांजली कामत, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, रोटरी क्लब कणकवलीचे अध्यक्ष रवी परब, उमा परब, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, राजन परब, सुशील पारकर, भाई परब, पंकज पेडणेकर, नवू झेमणे, राज नलावडे आदी उपस्थित होते.
   श्री. राणे म्हणाले, समीर नलावडे मित्रमंडळातर्फे शहरात गेली तीन वर्षे दिवाळी बाजार भरविण्यात येत आहे. मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. दिवाळी बाजारच्या माध्यमातून शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी मार्केट उपलब्ध होत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. शहरातील नागरिकांसाठी समीर नलावडे मित्रमंडळातर्फे दिवाळीबाजारासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मंडळाचे हे कार्य अतुलनीय आहे, असे राणे म्हणाले.
   यावेळी आम.नितेश राणे यांचे समीर नलावडे मित्रमंडळ, महिला बचत गट, शहर भाजप व महिला मोर्चातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर राणे यांनी बाजारात मांडलेल्या स्टॉलची पाहणी केली. बाजारात दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे ३२ स्टॉल मांडण्यात आले असून कुंभार समाजाबांधवांनी बनविल्या मातीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, आकाशकंदील यासह अन्य वस्तू उपलब्ध आहेत. बाजाराच्या पहिल्या दिवशी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.