वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने देवगड तालुक्यात लाखोंचे नुकसान; सर्वाधिक १९८ मिमी पाऊस. शिरगाव, दाभोळे ,खाकशी, जामसंडे, किंजवडे येथे मोठे नुकसान.

देवगड.
तालुक्यात रविवारी सायंकाळी सोमवारी दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने हाहाकार माजविला.तालुक्यातील नदीनाले दुथडी भरून वाहत होते. बऱ्याच ठिकाणी सकल भागातील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.तर वाडा चांभारभाटी पुलानजीक पाणी आल्याने पडेल देवगडची वाहतुक बंद होती.देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर घाटे पेट्रोलपंप ते फाटक क्लास वडंबापर्यंत पाणी आल्याने वाहतुकीचा वेग ही मंदावला होता.या मुसळधार अतिवृष्टीमुळे माड बागायती तसेच शेतजमिनी पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे.यापावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अंदाजे सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. देवगड तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत देवगड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.या झालेल्या अतिवृष्टीमुळे मोंड येथील कोळंबी प्रकल्पासमोरील मार्गावरील दरड कोसळून रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. मात्र तासाभरातच जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेली दरड हटवून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. वाडा चांभारवाटी या ठिकाणी या मार्गावर पाणी आल्याने वाडा पुलावरून होणारी पडेल देवगडची वाहतूक सकाळी पूर्ण बंद झाली होती. देवगड आनंदवाडी भाटी, दाभोळे येथील माड बागायती, देवगड निपाणी मुख्य मार्गावरील जामसंडे येथील घाटे पेट्रोल पंप ते फाटक क्लास मार्गावर पाणी आल्याने या मार्गावर या मार्गावरून होणारे वाहतूक संथ गतीने होत होती.इळये पाटथर येथील पापडी पुलावर देखील पाणी आल्याने कुणकेश्वर इळये मार्गे देवगडची वाहतूक बंद होती.
रविवारी सायंकाळी ते सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे सुमारे १४ लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. यामध्ये प्रदीप जनार्दन वाडये यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून १५,५००/-, दाभोळे येथील आत्माराम अर्जुन कुळकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ७८००/-, तर तेथीलच सुनिता आप्पा कदम यांच्या दुकानाच्या पत्रांचे ७८००/-, सुनिता आप्पा कदम यांच्या घराच्या पडवीचे पत्रे उडून ९०००/-, मालपेवाडी येथील दिपाली सुतार यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ३० हजार, किंजवडे येथील राजन शांताराम किंजवडेकर यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून २ लाख, जामसंडे कट्टा येथील प्रकाश भिकाजी मणचेकर माती व दरड उसळून ४० हजार, तोरसोळे येथील धाकू जानू वरक यांच्या घराचे अतिवृष्टीने छप्पर कोसळून ५० हजार, हिंदळे येथील शिवराम मधुकर खोत यांच्या घरामध्ये पाणी घुसून धान्य घरघंटी व फ्रिज असे ३७,६५०/- रुपये, दाभोळे येथील तुकाराम बाबी राणे यांच्या घराचे १३,२००/-, तेथीलच प्रणय पांडुरंग हरी घाडी यांच्या घराचे ३६,४००/- हजार चारशे छाया कृष्णा जाधव यांच्या घराचे ३५००/- , वसंत भिवा चव्हाण यांच्या घराचे १ लाख ५६ हजार ६७५/-, वसंत भिवा चव्हाण यांच्या गोठ्याचे ८७७५/-, शिवाजी तानाजी घाडी यांच्या घराचे ३०,८००/-, रमेश धोंडू कदम यांच्या घराचे १४,५००/- , हेमंत सोमा कदम यांच्या घराचे ५३००/-, रमाकांत धोंडू कदम यांच्या घराचे १५००/- विजय आबा कुळकर यांच्या शौचालयाचे २४००/- नंदिनी सुरेश कुळकर यांच्या शौचालयाचे ४९००/- सुशील शामसुंदर जाधव यांच्या गोठ्याचे १७५० /- रुपयांचे नुकसान मुंडगे येथील पुष्पलता दत्तात्रय पारधी यांच्या घराचे २ लाख २० हजार, जामसंडे खाकशी येथील श्रीधर पुंडलिक पेडणेकर यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळून २ लाख, शिरगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इमारतीवरील कौले फुटल्याने इमारतीमधील धान्य व खत भिजून १ लाख २० हजार, येथीलच संतोष अशोक वाडये यांच्या घराचे ५०००/- ,मालती दिनकर वाडये यांच्या घराचे ५०००/-, महादेव दिनकर साटम यांच्या घराचे ९०००/- लक्ष्मीकांत रामचंद्र धुळप यांच्या घराचे ५०००/-, संतोष अंकुश तावडे यांच्या घराचे ५०००/-, विजय आत्माराम साटम यांच्या घराचे १० हजार ,विजय गणपत साटम यांच्या घराचे ४०००/-, राजाराम अंकुश तावडे यांच्या घराचे ९७,७००/-, जनार्दन शांताराम शिंदे यांच्या घराचे ५०००/-, प्रदीप महादेव साटम यांच्या घराचे ३०००/- ,दिलीप प्रभाकर तावडे यांच्या गोठ्याचे ८०००/-, वसंत सोनू जाधव यांच्या घराचे ३०००/-, हजार तर श्रीपत तुकाराम जाधव यांच्या घराचे ५०००/-, असे मिळून देवगड तालुक्यात एकूण १३ लाख ८२ हजार २०० रुपयाचे नुकसान रविवार ७ व सोमवार ८ जुलै रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे झाले असल्याची नोंद तहसील मध्ये करण्यात आलेली आहे.
या झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंदळे काळभैरव मंदिरासमोरील तसेच मुणगे, दाभोळे, खुडी, कोटकामते, नारीग्रे, दहीबाव,
बागमळा, पाटथर, तोरसोळे, आरे या भागातील भातशेती पूर्ण पाण्याखाली गेलेली होती.
पाणी साचल्यामुळे सकाळी हे मार्ग होते बंद-
हिंदळे -मोर्वे, दहिबाव -नारीग्रे, दहिबाव-मिठबाव,
खुडी-कोटकामते, पाटथर-देवगड, रहाटेश्वर-कालवीवाडी कॉजवे बापर्डे, याबरोबरच इतर सकल भागातील कॉजवे पाण्याखाली गेल्याने काही काळ तेथील वाहतुकीच्या खोळंबा झालेला होता.दुपार नंतर पावसाचा वेग थोडा मंदावलेला होता.