तोंडवली येथे ग्रामीण कृषी उद्योजकता जागरुकता विकास योजनेअंतर्गत शेततळ्याचे प्रात्यक्षिक.

तोंडवली येथे ग्रामीण कृषी उद्योजकता जागरुकता विकास योजनेअंतर्गत शेततळ्याचे प्रात्यक्षिक.

कणकवली.

    राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाटच्या कृषीकन्यांनी तोंडवली येथे ग्रामीण कृषी उद्योजकता जागरुकता विकास योजनेअंतर्गत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. यामध्ये कोकण विभागात अति महत्वाचे असलेल्या शेततळ्याच्या प्रात्यक्षिकाला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला.
   कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाटच्या चतुर्थ वर्षातील कृषीकन्या सध्या तोंडवली विभागात ग्रामीण कृषी उद्योजगता जागरुकता अंतर्गत शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधुनिक शेती, तंत्रज्ञान याबाबत परिपूर्ण माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर करून शेतक-यांना माहिती देत आहेत.
   कोकणातील जास्तीत जास्त शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. हे लक्षात घेऊन रब्बी हंगामात शेती करायची तर शेततळ्याला खुप महत्व आहे. याचेच प्रात्यक्षिक सादर करून शेतक-यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. तर शेतक-यांनाही याला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
  यावेळी स्नेहल पाटील, प्रगती पाटील, पियुषा मांजरेकर, वैष्णवी शेटे, किर्ती पाटील, सानिका कांबळे, वैष्णवी पाटील, अंजली पाटील उपस्थित होते. तर कृषी महाविद्यालय फोंडाघाटचे प्राचार्य श्री. संते, श्री. शिर्के, श्रीमती सुखवे, श्रीमती पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.