आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात एमएस-एक्सल प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एमएस-एक्सलचा वापर करून सांख्यिकीय डेटा विश्लेषण" या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लागला.
प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान प्रायोजित आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डेटा विश्लेषण कौशल्ये आत्मसात करण्याच्या उद्देशाने संख्याशास्त्र विभाग, गणित विभाग व आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रथम सत्र डॉ. सोमनाथ पवार, प्राध्यापक, संख्याशात्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, द्वितीय सत्र रमेश लोणारः व्यवस्थापक, रत्नाकर बँक लिमिटेड, कोल्हापूर, तृतीय सत्र प्रा. रणजित पाटीलः लेखाशास्त्र विभाग, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी (व्याख्यानः सहकारी संस्थांमधील माहितीचे विश्लेषण)
यांनी उपस्थित राहून सहभागींना एमएस- एक्सेल च्या विविध उपयोजनांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रभाकर गायकवाड (व्यवस्थापक-SDCC बँक, प्रल्हाद कुडतरकर (तालुका विकास अधिकारी SDCC बँक), अभिनय विचारे, (सहकार अधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय वैभववाडी), सज्जन रावराणे (अध्यक्ष, स्थानिक समिती) प्रमोद रावराणे, (सचिव, स्थानिक समिती) यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी, उपप्राचार्य डॉ. मारुती कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय रावराणे उपस्थित होते. समारोप प्रसंगी सर्व सहभागींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन भास्कर, सह-समन्वयक प्रा. प्रतिमा मांजरेकर, सचिव प्रा. विजय शिंदे तसेच आयोजन समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच आनंदीबाई रावराणे महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. वैभववाडी, शिक्षकेत्तर कर्मचारी सोसायटी, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन भास्कर यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा. निलेश कारेकर यांनी केले.

konkansamwad 
