परुळेबाजार येथे मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन.

वेंगुर्ला
पंतप्रधान मोदी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत भाजपा परुळे विभाग भाजयुमो वेंगुर्लेतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ९.०० ते १.०० वाजेपर्यंत ग्रामपंचायत परुळे बाजार सभागृह येथे आयोजित केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क निलेश सामंत - 9422436320 प्रसाद पाटकर - 9420821746 सुनील चव्हाण - 9403558132 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.