वैभववाडी तालुका ग्राहक पंचायत अध्यक्षपदी कुमार स्वामी तर सचिवपदी तेजस साळुंखे
वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुका शाखा अध्यक्षपदी कुमार स्वामी तर सचिपदी तेजस साळुंखे यांची निवड करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुका शाखेच्या पुनर्बांधणीसाठी सभा नुकतीच संपन्न झाली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्याची पुनर्बांधणी करण्यासाठीची बैठक वैभववाडी येथे राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव संदेश तुळसणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला वैभववाडी तालुका शाखेचे जुने पदाधिकारी व काही नवीन सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर वैभववाडी तालुका शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष कुमार स्वामी, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, संघटक तेजस आंबेकर, सचिव तेजस साळुंखे, सहसंघटक इंद्रजित परबते, सहसंघटक महिला संपत्ती चौगुले, सहसचिव विद्या पाटील, कोषाध्यक्ष सुधाकर पुरीबुवा, प्रसिद्धी प्रमुख मंदार चोरगे, सल्लागार ॲड. प्रताप सुतार, सल्लागार एस.पी. परब यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष कुमार स्वामी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सभेचे प्रास्ताविक तेजस साळुंखे यांनी केले तर आभार जयवंत पळसुले यांनी मांडले.

konkansamwad 
