शरद पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला

शरद पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला

मुंबई 


    आज राज्यसभेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले, यामध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आणि शिवसेना पक्षाचा एक तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थित न राहता अशा पद्धतीने शरद पवार  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग १९६८ साली सुप्रीम कोर्टात निवाडा झाला होता. यावेळीआरोग्यासह कुठल्या ही वैध कारणास्तव उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसेल तर संविधानाच्या कलम ८४ अ प्रमाणे विहीत नमुन्यात शपथपत्र सादर करण अनिवार्य असते. जेजे रुग्णालयाचे अधिक्षक संजय सुरवसे यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी सदर अर्ज विधीमंडळात येऊन निवडणूक अधिकारी यांना सादर केला. पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक पक्षाकडून आणि दुसरा अपक्ष, खबरदारीचा उपाय म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर या तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करु शकतो. महाराष्ट्रात शरद पवार यांनी पहिल्यांदाच असा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राज्यसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट आला आहे. दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिला आहे. ज्योती वाघमारे यांनी अर्ज सादर केला असून रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील सात जागांसाठी अखेर सात अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे सहा अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं समोर आल आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकादा अर्ज जरी चुकून बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहणार आहे.दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना हजर राहता आलं नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आजारी व्यक्ती राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकला नाही अशी पहिलीच घटना घडली.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी?

▪️भाजप
रामदास आठवले 
विनोद तावडे
माया चिंतामण ईवनाते
रामराव वडकुते 

▪️शिवसेना शिंदे गट-
ज्योती वाघमारे 

▪️राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-पार्थ पवार 

▪️महाविकास आघाडी -
शरद पवार