इन्सुलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; एकूण ४ लाख ३ हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

इन्सुलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; एकूण ४ लाख ३ हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी.

    राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली या पथकाने जुना पत्रादेवी-बांदा रोड, बांदा पोस्ट ऑफिसजवळ इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर सिलव्हर रंगाचे मारुती सुझुकी कंपनीचे अल्टो चारचाकी वाहन क्र. MH-01-NA-9032 या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डचे 44 बॉक्स अवैध साठा मिळून आला.यामध्ये 2 लाख 53 हजार 440 रुपये  किंमतीचे मद्य व 1लाख 50 हजार रुपये किंमतीचे चारचाकी वाहन मिळून  एकुण 4 लाख 3 हजार 440 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह महेश कृष्णा दाभोलकर रा.सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
   सदर कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दिपक वायदंडे, माळी जवान प्रसाद व जवान नि.वाहन चालक रणजीत शिंदे, यांनी केली.सदर प्रकरणी पुढील तपास तपासणी नाका इन्सुली दुय्यम निरीक्षक प्रदिप रास्कर हे करीत आहेत.