राज्यात पुरोगामी शिक्षक संघटना ५० हजार वृक्ष लागवडीचा पर्यावरण पूरक उपक्रम राबविणार; राज्य कार्यकारी मंडळ सभा कणकवली येथे घेतला ठराव.
देवगड.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा कणकवली येथे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या वेळी राज्य नेते विजय भोगेकर, हरिश ससनकर राज्यसरचिटणीस, प्रकाश पाध्ये राज्य कार्याध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष जी एस मंगनाळे, शारदाताई वाडकर - राज्य महिला सरचिटणीस , प्रकाश पाटील राज्य संघटक, राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर ,प्रमिला माने राज्य महिला उपाध्यक्ष इत्यादी राज्य पदाधिकारी तसेच विविध जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सर्व राज्य, जिल्हा पदाधिकारी यांनी आढावा सादर केला.शिक्षकांचे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच विभागवार प्रश्न चर्चेला घेण्यात आले.हे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले. विद्यार्थ्याना पोषण आहार चांगल्या प्रतीचा मिळावा, गणवेश वेळीच मिळावेत , जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी भरघोस प्रयत्न व्हावेत .शिक्षकांना केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी अश्या विविध पदांवर पदोन्नती मिळावी.त्यासाठी उच्च शैक्षणिक पात्रता सुधा लक्षात घ्यावी. जिल्हांतर्गत तसेच आंतर जिल्हा बदल्या बाबत चर्चा झाली.रोस्टर प्रश्न मार्गी लागावेत.पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, अशैक्षणिक कामे बंद व्हावीत या सारख्या अनेक बाबीवर चर्चा होऊन शासन दरबारी भेटी देत निवेदने द्यावीत असे ठरले. यावेळी सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून राज्यात 50 हजार वृक्ष लागवडीचा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते ठरविले आहे. संघटनेचे अधिवेशन रायगड जिल्ह्यात पुढील काळात होऊ घातले आहे या बाबत नियोजन करण्यात आले .या सभेसाठी सुरेश साळवी जेष्ठ सल्लागार रत्नागिरी, गोविंद पाटील रायगड जिल्हा नेते, सचिन जाधव सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, एस के पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, इरफान मिर्झा जिल्हाध्यक्ष वाशिम, महेंद्र हिरवे जिल्हाध्यक्ष अमरावती, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यशवंत पेंढारकर संघर्ष सावरकर जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर, देवगड तालुकाध्यक्ष आनंद जाधव, प्रदिप पवार जिल्हा सरचिटणीस रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे,जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष नितीन पेढेकर, जीवन भोयर, गजानन चिंचोळकर सुभाष अडवे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, जिल्हा उपाध्यक्ष किरण राठोड, जिल्हा संघटक बालाजी हाळदे, जिल्हा संघटक देवराव अमोदे गोकुळ चारथळ अचलपूर तालुकाध्यक्ष, लक्ष्मण खोब्रागडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर, किशोर यनगंटीवार चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष, लक्ष्मण सुरपाम चंद्रपुर तालुका संघटक जगदीश ठाकरे चेअरमन शिक्षक सहकारी पतसंस्था भद्रावती, बाबा रणसिंग तालुकाध्यक्ष पन्हाळा, नाथ मोरे तालुकाध्यक्ष पन्हाळा,मनोज पवार तालुका उपाध्यक्ष पन्हाळा यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सभेचे सूत्र संचालन सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर यांनी केले.प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा नेते तथा केंद्र प्रमुख अशोक जाधव यांनी केले.