जागतिक महिला दिनानिमित्त कणकवलीत स्वच्छता अभियान

जागतिक महिला दिनानिमित्त कणकवलीत स्वच्छता अभियान

 

कणकवली

 

   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कणकवली शहरामध्ये कणकवली रोटरी क्लब आणि कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात प्रभाग क्रमांक ७ मधील परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्रभागाच्या नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात नगरसेविका सुप्रिया नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, रोटरी क्लबच्या वर्षा बांदेकर, निधी निखार्गे, शिल्पा सामंत, मिता कवडे, नीलिमा वालावलकर, राज नलावडे, निनाद ढवळे, आकाश सामंत, भावेश निग्रे, तसेच नगरपंचायत कर्मचारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.