उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वेंगुर्ला दौरा. तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद.

उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वेंगुर्ला दौरा.  तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद.

वेंगुर्ला.  

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात दौरा कार्यक्रम चालू आहे.प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटी देऊन ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करत आहेत.
   त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वेंगुर्ला तालुका दौरा कार्यक्रम 13 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील काही गावांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत.त्यांचा उद्या 13 एप्रिल 2024 चा वेंगुर्ला तालुक्यातील बैठकीसाठीचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
    सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद म्हापण शरयू मंगल कार्यालय पाट, दुपारी 12.30 वाजता जिल्हा परिषद आडेली गोगटे मंगल कार्यालय वेतोरे, दुपारी 2 ते 3 वाजता मध्यान्न भोजन वेंगुर्ला येथे तर संध्याकाळी 3.30 वाजता जिल्हा परिषद उभादांडा सातेरी मंगल कार्यालय अणसुर तीठा, संध्याकाळी 5.30 वाजता जिल्हा परिषद तुळस उत्सव मंगल कार्यालय व संध्याकाळी 6.30 वाजता जिल्हा परिषद रेडी माऊली मंगल कार्यालय शिरोडा येथे संपन्न होणार आहे.