डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांचे प्रतिपादन; धामापूर येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली.   सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांचे प्रतिपादन; धामापूर येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

मालवण.

     भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमते विरोधात लढा दिला.समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली.शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांनी धामापूर येथे केले.
    भारतीय बौध्द महासभा गाव शाखा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ व्या जयंती उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
    यावेळी विचारमंचावर अध्यक्ष स्थानी प्रमुख पाहुणे जि.प.माजी समाजकल्याण सभापती बाळ महाभोज, सुजय कदम मालवण तालुका कोषाध्यक्ष, विलास नाईक, धामापूर बौद्ध विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी प्रकाश धामापूरकर, संजय जाधव, सचिव संदेश धामापूरकर, सत्यवान नाईक, नीलकंठ धामापूरकर उपस्थित होते.
  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळ महाभोज म्हणाले की, डॉ.आंबेडकरांचा जीवन प्रवास बराच अडचणींचा हाल अपेष्टांचा होता याला सामना देत देशाचे घटना तज्ज्ञ झाले या संविधानामुळे देशातील गरीब, वंचित आणि सामान्य व्यक्ती न्याय मागू शकतो या संविधानातून माणसाला माणुस म्हणुन जगण्याचे त्यांनी अधिकार दिले असे हि ते म्हणाले.
   संदेश धामापूरकर बोलताना म्हणाले कि डॉ.बाबासाहेब एका जाती धर्माचे नसून संपूर्ण विश्व आज त्यांना ओळखतो म्हणून भारता प्रमाणे अन्य देश हि त्यांची जयंती साजरी करतात असे मनोगत व्यक्त केले.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी बुद्ध पूजा, प्रतिमा पूजन, विध्यार्थ्यांचे  मनोगत व्यक्त करून डॉ.आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.यानंतर दुपारी खेळ पैठणीचा, लकी ड्रॉ,रात्री सांस्कृतिक कार्यक्रम व जयभिम चित्रपट दाखविण्यात आला.
   यावेळी अविनाश नाईक, सचिन कोळंबकर, जयेश नाईक, विशाल धामापूरकर, स्वप्निल नाईक, विष्णू नाईक, कृणाल नाईक, नारायण धामापूरकर, कालिदास नाईक, विवेक धामापूरकर, मदन नाईक, रोशन नाईक, गंगाराम धामापूरकर, मेघनाथ कदम, गणेश कोळंबकर आदी उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश धामापूरकर तर उपस्थित सर्वांचे आभार विलास नाईक यांनी मानले.