सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आ.वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. कणकवली व मालवण तालुक्यातील ९० नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

कणकवली.
शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख तथा जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज संपन्न झाले. यामध्ये कणकवली आणि मालवण तालुक्यातील ९० नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातील काही जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्याबद्दल नागरिकांनी आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांचे आभार मानले.
यावेळी कनेडी शिवसेना शाखा येथे कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महेंद्र डिचोलकर,मंगेश सावंत, संतोष परब, अमेय ठाकूर बेनी डिसोजा, कुणाल सावंत, गणेश शिवडावकर, शेखर सावंत, तुषार गावकर, रुपेश सावंत, संजय सावंत, आर. एच. सावंत, दिनेश वाळके यांसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले नागरिक उपस्थित होते.