सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


 कणकवली 


     लोरे गावचे सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडाघाट रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली 8 वर्षे चंदू रावराणे मित्रमंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण व दीप प्रज्वलन करून  रक्तदान  शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सुशांत नाईक यांनी चंदू रावराणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपण करत असलेल्या सामाजिक कार्याचा वसा आपण कायम ठेवावा. आपण गेली 8 वर्षे राबवत असलेला रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रम यामुळे गरजू लोकांना याचे सहाय्य होते. असेच सामाजिक उपक्रम आपल्या माध्यमातून होत राहोत अशा शुभेच्छा यावेळी नाईक यांनी दिल्या.यावेळी सिद्धेश राणे, अमित रावराणे, सुस्मित घाग, चंदू सुतार, राजेश धुरी, प्रीतम राणे, संतोष गुरव, दुर्वेश राणे, प्रणय सावंत, विनय रावराणे, हर्षद खरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.