सुप्रिया राऊळ हिचा सावंतवाडीतील राजवाड्यात सत्कार.......स्वरचित काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल विशेष सत्कार

सुप्रिया राऊळ हिचा सावंतवाडीतील राजवाड्यात सत्कार.......स्वरचित काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल विशेष सत्कार

 

सावंतवाडी

 

       पुणे येथील वेलनेस फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत माडखोल गावची कन्या तथा सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सुप्रिया लिंगोजी राऊळ हिने
प्रथम क्रमांक पटकावला, स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते तिला स्वामी विवेकानंद आदर्शरत्न सन्मानाने गौरविण्यात आले. सुप्रिया राऊळ हिच्या आजपर्यंतच्या वाटचालीत तिला माडखोल गावासह श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचेही सहकार्य लाभले आहे. सावंतवाडी संस्थानचे खेम सावंत-भोसले, शुभदादेवी भोसले, लखम सावंत-भोसले, श्रद्धाराजे भोसले यांनी सुप्रिया राऊळ हिचा राजवाड्यात सत्कार केला.


    सुप्रिया यांच्या काही स्वरचित कविता पुढील प्रमाणे

 

भावनेचे शब्द झाले, आसवांचे काजवे
मी न वाटे शब्द हा मोठा, हे सुखाचे बहाणे
काळजा परी शब्द हा अनोखा, जाळतो का रे मना
वेदनेचे ते घाव हे दावितात, दुःखाच्या त्या पाऊल खुणा
सुप्त झाली ती मनाची कवाड, शोधतात ती सुखाची द्वार मिटलेल्या डोळ्यात ही पाझरते, अश्रू ची ती धार
न बोलवे मनाशी, दाटून येई दुःख उरी
जशी भवसागराची गती, तशी डोळ्यातल्या
अश्रू ची धार येई गालावरी
भावनेचे शब्द झाले, आसवांचे काजवे

 

क्षण भर विश्रांती घ्यावी
असं वाटतय देहाला
पण चंचल मनाची कथा
सांगू मी कुणाला
देह थकतो पण मन मात्र
कधीच थकत नाही पण
या चंचल मनाच ऐकतात
ऐकतात देह
थकतोय हे मात्र मनाला
कधीच कळत नाही
असं च असत आपल मन नभात उडण्यऱ्या पाखरासारख
ते कधीच कुणाचं ऐकत नसत
वाऱ्यासारख पळणार,
झाडाला टांगलेल्या झोक्यासारख
उंच उंच नभात झेप घेण्याचं
स्वप्न पाहणार मन
कधी कुणाला कळतच नसत
असंच असत आपल मन ते
कधी कुणाला कळतंच नसत