न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा शाळेत वेंगुर्ले पोलिसाचे विशेष मार्गदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा शाळेत वेंगुर्ले पोलिसाचे विशेष मार्गदर्शन

 

वेंगुर्ला
     वेंगुर्ला पोलीसांकडुन सुरु असलेल्या जनजागृती कार्यक्रमाचे सर्व शाळा, महाविद्यालयातुन स्वागत होत असुन या मार्गदर्शन वर्गा बाबत  अभिनंदन होतं आहे. 
    सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व जनतेला व शाळा काॅलेज मधील विद्यार्थ्यांना सायबर फ्राॅड, नशा मुक्ति, डायल 112 यावर जनजागृतीचे कार्यक्रम सर्व तालुका पोलीस ठाणे स्तरावर सुरु आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे आदेशाचे पालन करुन कर्तव्य तत्पर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदिप भोसले हे जनजागृतीचे काम उत्कृष्ट रित्या राबवीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्या  मार्गदर्शनाखाली म. पो. हवा. रंजिता चौहान, म.पो.ना. सावी पाटील, पो.काॅ. परुळेकर यांनी शहर भागासह ग्रामीण भागातही जाऊन लोकांना एकत्रित करुन सायबर फ्रॉड, नशा मुक्ती, डायल 112 चे कार्यक्रम आयोजित करुन प्रत्येकाशी संवाद साधुन पोलीस व जनता हे विश्वासाचे संबंध निर्माण केल्याची चर्चा लोकामधुन होत आहे. 
वेंगुर्ला हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालय जाऊन मुलांना मार्गदर्शन करुन त्यांना सायबर गुन्ह्यांपासुन सावध रहाणेबाबत, व्यसनापासुन दुर रहाणेबाबत, तसेच डायल 112 चे महत्व पटवुन दिले. सोशल मिडियाचा अतिरिक्त वापराने कशा प्रकारे गुन्हे घडुन आपले नुकसान होऊ शकते हे अनेक उदाहरणाने सांगुन, महिला मुलींच्या सुरक्षिततेबाबत नुकतेच न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयात मार्गदर्शन केले.
शाळेतील अल्पवयीन मुला मुलींशी संवाद साधुन त्यांना आयुष्य म्हणजे काय हे, ते कसे जगावे, यावर चर्चा करुन त्यांना ब-याच गोष्टी समजावून सांगितल्या त्याचबरोबर एकंदरीत आपल्या दररोजच्या धावपळीच्या कामातुन वेळ काढुन त्यांचे हे  जनजागृतीचे काम निश्चितच कौतुकास्पदच आहे महिला हवालदार रंजिता चौहान ह्या नेहमीच शाळा काॅलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. या विशेष मार्गदर्शनात पोलीसात लपलेला कवी या वेळी अनुभवायला मिळाला. म.पो.हवा. रंजिता चौहान या नेहमी आपल्या सहकाऱ्यांसोबत मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तत्पर असतात. प्रत्येक शाळा महाविद्यालयतील त्यांची ओळख आणि चांगले संबंध आहे. त्यातच सध्या सुरु असलेल्या सायबर फ्रॉड, नशा मुक्ती, डायल 112 या जनजागृती अभियानात शाळांमध्ये मार्गदर्शन करताना महीला हवालदार रंजिता चौहान यांनी अल्पवयीन मुलींसाठी त्यांच्या आई वडीलांना नजरेसमोर ठेवुन स्वतः लिहीलेली कविता वाचुन दाखविली. सर्वांच्या अंतकरणाला स्पर्श करील अशी कविता ऐकुन सर्व विद्यार्थी व शिक्षक भाऊक झाले. अनेकांच्या डोळ्यातील पाणी बघुन न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाच्या शाळेतील शिक्षकांनी चौहान यांच्या कवितेला दाद देत कौतुकाची थाप ही दिली. महिला हवालदार रंजिता चौहान यांना कवितेबाबत विचारले असता त्यांनी, विद्यार्थ्यांना शब्दातुन बरंच काही सांगितलं, मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात पोहोचण्यासाठी कविता लिहीली. काही गोष्टी कवितेतुन सांगण्याचा प्रयत्न केला असे सांगितलेले. खरच पोलीसात लपलेला कवी त्यावेळी आम्ही न्यु इंग्लिश स्कुल उभादांडा मधील सर्व शिक्षकांनी पाहिला त्यांनी लिहीलेली कविता, "कधीतरी त्यांच्यासाठी जगुन बघ ना" अंतकरणाला लागेल अशी कविता. त्यांच्या या प्रयत्नांना सलाम. या कार्यक्रमा वेळी व्यासपीठावर या प्रशालेचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, सौ मोहिते मॅडम, सौ भिसे मॅडम, सौ कुबल मॅडम, श्री बोडेकर सर लिपिक अजित केरकर आदी उपस्थित होते. या मार्गदर्शन वर्गाचे सुत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले.
    पोलिसांकडून राबवलेल्या मार्गदर्शन गरजचे असुन मग बद्दल शाळा व संस्थेच्या वतीने ही सिंधुदुर्ग पोलिस विभागाचे आभार करण्यात आले.