रानभाज्या म्हणजे कोकणच्या मातीची ओळख - वेदिका परब........‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जाई नाईक प्रथम

रानभाज्या म्हणजे कोकणच्या मातीची ओळख - वेदिका परब........‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जाई नाईक प्रथम

वेंगुर्ले


       रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनमोल ठेवा असून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे असे प्रतिपादन वेदिका विशाल परब यांनी केले असून माझा वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहर स्तर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री. विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व या स्पर्धेचे उद्घाटन वेदिका परब यांच्या हस्ते झाले असून कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा ज्येष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी बोलताना वेदिका परब म्हणाल्या की रानभाज्या म्हणजे आपल्या कोकणच्या खाद्यपरंपरेची ओळख असून पूर्वीच्या पिढ्यांच्या आहारात त्यांना महत्त्वाचे स्थान होते व बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक खाद्यपदार्थांचा वापर कमी होत असून त्यांचे महत्त्व नव्या पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे, रानभाज्यांपासून केवळ पारंपरिक भाजीच नव्हे तर विविध चविष्ट आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करता येतात आणि स्पर्धेतील महिलांनी दाखवलेली कल्पकता कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे महिलांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळते असे त्यांनी सांगितले, नगराध्यक्ष राजन गिरप यांनीही रानभाज्या ही स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असून या परंपरेचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे असे सांगितले, स्पर्धेत सहभागींनी लाडू, मोदक, सरबत, चटणी, सूप, अप्पे यांसह विविध पदार्थ सादर करून पारंपरिक पाककृतींना आधुनिक सादरीकरणाची जोड दिली, स्पर्धेत जाई सुनील नाईक यांनी टायकाळ्याचे लाडू, मोदक, सरबत व चटणी सादर करून प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांक सुश्मिता रामचंद्र गावकर यांनी लाजरीचे मोदक, लाडू व पेव्याचे सूप साठी, तृतीय क्रमांक सुजाता गुरुराज साटम यांनी चाईच्या मोहराची जास्वंद साठी, उत्तेजनार्थ प्रथम अनुष्का आनंद राणे यांनी मिक्स भाज्यांचे सूप साठी, उत्तेजनार्थ द्वितीय जान्हवी तुळशीदास सावंत यांनी कर्टुलाचे अप्पे व लाजाळूची चटणी साठी आणि उत्तेजनार्थ तृतीय मंगेश सुहास माणगावकर यांनी शेवगा-कर्टुलीयुक्त लाडू साठी पटकावला, स्पर्धेचे परीक्षण रश्मी राजेश कुडाळकर, डॉ. भारतेंदू भरत भारती आवळे आणि डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी चव, नावीन्य, रानभाज्यांचा प्रभावी वापर, पौष्टिकता व सादरीकरण या निकषांवर केले असून हा उपक्रम स्थानिक खाद्यपरंपरेचे जतन व महिलांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन देणारा ठरला, यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लब अध्यक्ष ज्योती देसाई, उपाध्यक्ष सई चव्हाण, सेक्रेटरी श्रिया परब, ट्रेझरर वृंदा गवंडळकर, एडिटर आरती गिरप, हिरकणी शहर स्तर संघ अध्यक्ष आकांक्षा परब, उपाध्यक्ष अस्मिना मकानदार, शिवानी तामणेकर, रसिका राऊळ, राधा बागवे, माझा वेंगुर्लाचे राजन गावडे, यासीरशहा मकानदार, खेमराज कुबल, अमृत काणेकर, महेश वेंगुर्लेकर, अवधुत नाईक, रामचंद्र शृंगारे, ऋतुजा गावडे, अमोल खानोलकर, प्रथमेश घारे, श्रेयस गावडे, भूषण मांजरेकर आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.