सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षीत ८७ मच्छिमार सिंधुपुत्रांना वॉटर स्पोर्टस परवान्यांचा व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थितीत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षीत ८७ मच्छिमार सिंधुपुत्रांना वॉटर स्पोर्टस परवान्यांचा व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.   केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व पालक मंत्री  रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थितीत.

सिंधुदुर्ग.

   जिल्ह्यात प्रथमच ८७ मच्छिमार सिंधुपुत्रांना गोवा येथे बॉटर स्पोर्टसचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देवून केंद्रीय संस्थेमार्फत अधिकृत परवाना देण्याचा स्तुस्त कार्यक्रम आरवली सागरतिर्थ येथील आराकिला या पंचतारांकित रिसॉर्टवर पार पडला.या कार्यक्रमासाठी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेश प्रभू, नाबार्डचे अध्यक्ष श्री. शाजी के.व्ही., जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे, आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. संजय दत्ता, सी.आय.आय. चे डॉ. राजेश कपुर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
   मानव साधन विकास संस्था ही महिला, शेतकरी, मच्छिमार, युवा, माजी सैनिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. कोकण किनारपट्टीचे सतत वृद्धिंगत होणारे पर्यटनमुल्य लक्षात घेवून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित, परिवर्तन केंद्र प्रकल्प, सिंधुदूर्ग आणि 'आय. सी.आय. सी. आय. फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'सिंधुपुत्र' हा उपजिविका निर्मितीक्षम कार्यक्रम ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत 'लाईफ सेव्हिंग तंत्र, वॉटर स्पोर्टस्' व पॉवर बोट हॅन्डलिंग' याचे निवडक ८७ मच्छिमार युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात आले.
   सदरचे प्रशिक्षण भारतातील नामांकित 'भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रबंध संस्थान' अंतर्गत 'राष्ट्रीय जलक्रीडा संस्थान-गोवा' या पर्यटन मंत्रालय, भारत सरकार अधिकृत संस्थेमध्ये देण्यात आले. विशेष बाब म्हणजे प्रथमच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १० सिंधुकन्यांनी सदरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
   राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेश प्रभू यांनी मानवसाधन विकास संरथेच्या सर्वांगिण विकासातून गेल्या २५ वर्षात या जिल्ह्यात निर्माण केलेल्या कौशल्य, रोजगार, पर्यटन, पर्यावरण व महिला सक्षमीकरणातील कामाचा उहापोह करुन कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री यांनी श्री. सुरेश प्रभु आणि त्यांच्या संस्थेने राबविलेल्या या अभिनव कार्यक्रमाबद्दल विशेष वाखाणणी करुन पर्यटन वाढीमध्ये अशा प्रकारच्या शारत्रशुध्द सुविधांचा अंतर्भाव करण्याचा हा दुरदृष्टी बिचार केल्याबद्दल संस्थेचे विशेष अभिनंदन केले. सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्याच्या कौशल्यवृध्दीमध्ये मानव साधन विकास संस्थेसारख्या संरथांचा असलेला सहभाग खूप मोलाचा असून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांना पालकमंत्री म्हणून सर्व ते सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही दिली. नाबार्डचे अध्यक्ष श्री. शाजी के.व्ही. यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना या जिल्ह्याच्या विकासासाठी नाबार्ड सर्वते सहकार्य करेल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे व अन्य मान्यवरांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. मानव साधन विकास संस्थेचे संस्थापक विश्वरथ डॉ. शरद सावंत यांनी आभार व्यक्त केले.
   या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मानब साधन संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. नंदोकिशोर परब यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी योगेश प्रभू, नकूल पार्सेकर, संजिव कर्पे, सुधिर पालव.