शिवसेनेने केलेला कार सेवकांचा सन्मान ही निश्चितच कौतुकास्पद बाब; खासदार विनायक राऊत. वेंगुर्लेत उ.बा.ठा. शिवसेनेतर्फे कार सेवकांचा सन्मान.

वेंगुर्ले.
ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून राम मंदिर होण्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या कार सेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास खासदार विनायक राऊत बोलत होते.शिवसेनेने केलेला कार सेवकांचा सन्मान ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे त्यांनी राम मंदिरासाठी केलेल्या योगदानाचा आणि बलिदानाचा हा पुरस्कार आहे, असे ते म्हणाले. यामध्ये श्रीनिवास फाटक, निलम गावडे, बाबूराव खवणेकर, विनोद लोणे, हेमलता वैद्य, सुगंधा मांजरेकर, उल्हास महाजन, बाळा कदम, देवीदास वेंगुर्लेकर तसेच दिवंगत असलेले उमेश दिपनाईक, द्वारकानाथ साळगांवकर, केशव तारी यांच्यावतीने त्यांच्या नातेवाईकांचा समावेश होता.भाजपाच्या माध्यमातून राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर श्रद्धेचा बाजार सुरू आहे. मात्र त्यांचे हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा देखील यावेळी ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, लांजाचे माजी सभापती दत्ताजी कदम, लांजाचे उपतालुकाप्रमुख रवी डोळस, बांद्राचे माजी नगरसेवक त्र्यंबके, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष नाथा मांजरेकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, शहरप्रमुख अजित राऊळ, वेंगुर्ला युवासेनेचे पंकज शिरसाट आदी व्यासपीठावर उपस्थित होते.