वेंगुर्ला येथे सचिन वालावलकर मित्र मंडळातर्फे भव्य आकाश कंदील स्पर्धचे आयोजन

वेंगुर्ला येथे सचिन वालावलकर मित्र मंडळातर्फे भव्य आकाश कंदील स्पर्धचे आयोजन


    शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन वालावलकर मित्र मंडळातर्फे तर्फे वेंगुर्ला रामेश्वर मंदिर नजिक शाळा नंबर 1 येथे दिनांक 28 ऑक्टोबर ला सायंकाळी पाच वाजता खुली भव्य आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 
    या स्पर्धेसाठी प्रथम 5000, द्वितीय 4000, तृतीय 3000, चतुर्थ 2000, पाचवा क्रमांक एक हजार व सहावा क्रमांक 500 रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत . तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संदीप परब 9423300841 , शैलेश केसरकर 9823460645 व मनीष सातार्डेकर 8408911661 यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन सचिव वालावलकर मित्र मंडळ तर्फे करण्यात आले आहे.