सिंधुदुर्गात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.....२.३७ कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीसह ४ जण ताब्यात

सिंधुदुर्गात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.....२.३७ कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीसह ४ जण ताब्यात

कुडाळ

 

       सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळमध्ये मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 37 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 2 किलो 373 ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण 2 कोटी 46 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आज दि. 29/08/2026 रोजी सायंकाळी 18.20 वाजता कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काही इसम प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांना माहिती देऊन दोन पंच, वजनकाटाधारक व वनरक्षक यांच्यासह पणदूर ते कडावल जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत कुलस्वामिनी एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयाच्या बाजूला सापळा रचण्यात आला.त्यावेळी काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (MH 07 AN 5294) आणि ग्रे रंगाची मारुती सुझुकी अर्टिगा (MH 07 AS 3747) या वाहनांमधून आलेले महेश रेवणकर, अमेय देसाई, अमित अणावकर, संकेत चव्हाण यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्रतिबंधित व्हेल माशाची उलटी विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे आढळून आले.या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 39, 42, 43, 44, 48, 51 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, परी. पोलीस उपअधीक्षक दिपक शेलार यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, ASI सुरेश राठोड, HC विल्सन डिसोजा, आशीष जामदार, PC अमर कांडर यांच्या पथकाने केली आहे.