राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाचे कणकवलीत लाईव्ह प्रक्षेपण.....युवक काँग्रेसचे आयोजन

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाचे कणकवलीत लाईव्ह प्रक्षेपण.....युवक काँग्रेसचे आयोजन

कणकवली

 

     पुणे येथे काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज 'छात्रो की गुंज' हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या हक्क, सुरक्षा, समान संधी आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर वाचा फोडण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे.या कार्यक्रमाला समर्थन देण्यासाठी आणि राहुल गांधी यांचे विचार जिल्ह्यातील युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस आणि कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने कणकवली येथे लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे.कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात आज या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी आणि काँग्रेस प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केले आहे.