सिंधुदुर्ग बँकेच्या भरतीसाठी आता ४ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्ग बँकेच्या भरतीसाठी आता ४ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

 

सिंधुदुर्गनगरी
 

      सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७३ लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत होती.आता उद्यापर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली असून उमेदवारांना ४ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्यास संधी मिळाली आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. दरम्यान जिल्हा बँकेतील ७३ लिपिक पदांच्या या भरतीसाठी आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रक्रियेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना या भरतीत संधी मिळावी म्हणून ४ ऑक्टोंबरपर्यंत ही मुदतवाढ दिल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
     www.sindhudirgdcc.com या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना या भरती प्रक्रियेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची मुदतवाढ करून देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.