सातोसे येथे देवी माऊली पंचायतन देवस्थानचा अखंड हरीनाम सप्ताह

सातोसे येथे देवी माऊली पंचायतन देवस्थानचा अखंड हरीनाम सप्ताह


बांदा 


        सातोसे येथील देवी माऊली पंचायतन देवस्थानचा अखंड हरीनाम सप्ताह रविवार, २ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ होणार आहे. या आठवडाभर चालणाऱ्या भक्तिसोहळ्यात गावातील विविध भजन मंडळांकडून अखंड भजन सादर केले जाणार आहे.
       रविवारी रात्री १२ वाजता भव्य दिंडी सोहळा पार पडेल.सोमवार, ३ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता सप्ताहाची सांगता, त्यानंतर पावणी, कौल व प्रसाद वितरण होईल.
संध्याकाळी ६ वाजता देवतांचा तरंगकाठी कवळास सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे.भाविकांनी या भक्तिसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवी माऊली स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती, मानकरी व ग्रामस्थां तर्फे करण्यात आले आहे.