परुळे ग्रामपंचायत व महिला बालकल्याण विभाग यांच्याकडून महिला मेळाव्याचे आयोजन.

परुळे ग्रामपंचायत व महिला बालकल्याण विभाग यांच्याकडून महिला मेळाव्याचे आयोजन.


     ग्रामपंचायत परुळे बाजार येथे ग्रामपंचायत व महिला बालकल्याण विभाग वेंगुर्ला यांच्या कडून महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
    सदर मेळाव्याला सरपंच प्रणिती आंबडपालकर, बालविकास प्रकल्प अधिकारी शर्मिष्ठा सामंत, पर्यवेक्षक संध्या मोरे तसेच मार्गदर्शनासाठी डॉ. प्रीती सामंत,  अॅड. अर्पिता वाटवे,  अॅड. तृप्ती प्रभूदेसाई,  रश्मी सामंत, कुडाळ पोलीस ठाण्याचे समुपदेशक महेंद्र जाधव, माजी सरपंच  प्राजक्ता चीपकर, सामुदाय आरोग्य अधिकारी  वैष्णवी पाटकर, काजल परब, ग्रामपंचायत सदस्य नमिता परुळेकर, पूनम परुळेकर, माधवी सरमळकर, आमिषा आमडोसकर, तन्वी चौधरी, गुरूशका  कोचरेकर,  आशासेविका रक्षिता गोवेकर, राजलक्ष्मी परुळेकर, कोमल मांजरेकर, परुळे बीटच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच महिला यांची उपस्थिती होती. याप्रसंगी महिलांना आरोग्य विषयक  कायदे विषयक  समुपदेशन याबद्दल मार्गदर्शन केले गेले.