केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे होता पदभार.

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती.  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे होता पदभार.

नवीदिल्ली.

   भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची सोमवारी(२४ जून) राज्यसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल सभागृहात ही जबाबदारी सांभाळत होते, मात्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता ही जबाबदारी जेपी नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
  १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज (२४ जून) पासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभागृह नेते असल्याने पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम सदस्यत्वाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर, इतर केंद्रीय मंत्र्यांसह २८० खासदार शपथ घेणार असून मंगळवारी (२५ जून) २६४ नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत.