त्रैलोक्य बौद्ध महासंघाची स्थापना हे भंन्तेनी मानव कल्याणासाठी केलेले महान कार्य : सिध्दार्थ तांबे. कणकवली येथे भंन्ते उर्गेन संघरक्षितजी यांची जयंती साजरी.
कणकवली.
त्रैलोक्य बौद्ध महासंघाची स्थापना हे भंन्तेनी मानव कल्याणासाठी केलेले महान कार्य आहे.बाबासाहेबांच्या निधनानंतर बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा सेवक तयार करण्याचे काम भंतेंनी आपल्या खांद्यावर घेतले व पूर्ण प्रशिक्षित धम्म उपासक, धम्मचारी यांच्या रूपाने निर्माण केला.असे प्रतिपादन धम्ममित्र सिध्दार्थ तांबे यांनी कणकवली येथे केले.त्रिरत्न बौद्ध महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक कीर्तीचे बौद्ध विचारवंत, उर्गेन संघरक्षितजी यांचा ९९ वा जयंती उत्सव कार्यक्रम आद.धम्मचारी अमृतसागर यांच्या कणकवली येथील निवासस्थानी नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप,धूप पुष्पांजली अर्पण करून आदर्शांची पुजा करण्यात आली.
धम्मचारी अमृतसागर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात पूजेची सुत्रे ध.सिमा कांबळे यांनी सांभाळली तसेच ध्यान सराव ध.अजय तांबे यांनी घेतला.
भंन्ते उर्गेन संघरक्षितजी यांच्या २०२४ ते २०२५ या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने काही संकल्प करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा घेऊन करण्यात आली.
यावेळी धम्ममित्र आयु मिलिंद सर्पे, ध.अजय तांबे, वैभवी तांबे, सिमा कांबळे,निता तांबे, स्वाती तांबे, प्रभा कुवळेकर, विजय तांबे, हेमंत तांबे, सुगत तांबे, शुभम तांबे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत ध.अमोल पावसकर यांनी केले तर आभार ध.वैभवी तांबे यांनी मानले.