उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार साप्ताहिक विशेष गाडी.

रत्नागिरी.
कोकण रेल्वेने उन्हाळी कालावधीत प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी - कोचुवेली एलटीटी साप्ताहीक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी मध्य रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहे. यापूर्वीच उन्हाळी कालावधीसाठी उधना मेंगलोर उधना द्विसाप्ताहीक गाडी सोडण्याचा निर्णय झाला आहे. अर्थात आतापर्यंत उन्हाळी कालावधीसाठी दोन जादा गाड्या सोडण्यात आल्या असून प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. एलटीटी- कोचुवेली (०१४६३) ११ एप्रिल ते ६ जून या कालावधीत दर गुरुवारी सायंकाळी ४ वा. एलटीटी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वा. कोचुवेली येथे पोहोचेल. कोचुवेली- एलटीटी (०१४६४) १३ एप्रिल ते ८ जून या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी ४.२० वा. कोचुवेली येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वा. एलटीटी येथे पोहोचेल. गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडपी, मेंगलोर, कासरगोड, कन्नूर, कोषिक्कोड, थिरुर, शोरनूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्यम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकूलम, कोल्लम या स्थानकांवर थांबा आहे. रेलवे प्रवाशांनी यची नोंद घ्यावे,असे आवहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.