कणकवली येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन; भजन करत दर्शविला निषेध.

कणकवली येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत  निषेध आंदोलन; भजन करत दर्शविला निषेध.

कणकवली.

    मालवण राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत,असा आरोप कणकवली भाजप कडून करण्यात आला. या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी कणकवली भाजप च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजन व निदर्शने करत "महाविकास आघाडी चा निषेध व्यक्त करण्यात आला. विशालगड अतिक्रमण, राष्ट्रवादी नेत्यांचे किल्ल्यावरील प्रणयी चित्रीकरण, कर्नाटक सरकार मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हटवण्यात आलेले तैलचित्र या विषयावर आंदोलनातून आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारण्यात आले. राजकोट वर महाराजांचा पुतळा उभारल्या पासून कधी बघायला सुध्दा न आलेले दुर्घटनेचे राजकरण करण्यासाठी मात्र लगेच जिल्ह्यात आले असे कणकवली भाजप कडून सांगण्यात आले.
   यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, माजी जी.प. अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा चिटणीस संतोष कानडे, मेघा गांगण, सोनू सावंत, संतोष पुजारे, सर्वेश दळवी, अण्णा खाडये, प्रकाश पारकर, गणेश तळगावकर, समीर प्रभुगावकर, सागर राणे, महेश लाड, संदिप सावंत, चिन्मय तळेकर, स्वप्नील चिंदरकर, राजू पेडणेकर, प्रशांत राणे, शैलेश सुर्वे, दिनेश मुद्रस, बबलू पवार, विजय इंगळे, श्रेयस चिंदरकर, अभय गावकर, परशुराम झगडे, पपू ब्रम्हदडे,बाबू नारकर, अभिजित सावंत, लवू परब, मंदार मेस्त्री, रोहित ठाकूर, सर्वेश बागवे उपस्थित होते.