मॅग्नेट प्रकल्पांतर्गत कार्यशाळा संपन्न.

सिंधुदुर्ग.
मॅग्नेट प्रकल्पाच्या स्वारस्य निविदा ४ चे अंमलबजावणीच्या अनुषंगाने सन २०२४-२५या वर्षातील उपप्रकल्पांचे नियोजित लक्षांकानुसार उदिष्ट साध्य करण्यासाठी प्रकल्पातील मॅचिंग ग्रँट उपघटकांतर्गत मुल्यसाखळीत अंतर्भुत असलेल्या काढणी पश्चात हाताळणी व व्यवस्थापन, मुल्यवृद्धी, प्रक्रिया, विपणन आदी सुविधांच्या उपप्रकल्पांना मंचिग ग्रँट घटकांतर्गत सन २०२४-२५ (RFP EOI-4) या वर्षातील पायाभूत सुविधांचे उपप्रकल्प निवडीसाठी दि. ११ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या स्वारस्य निविदेच्या अनुषंगाने इच्छुक FPC's व VCO's यांचे अर्ज व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात कार्यशाळा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, रत्नागिरी मार्फत हॉटेल सावंत पॅलेस येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस एकूण ८३ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात २४ FPC आणि २२ VCO आणि २ CMRC आणि १ राज्य समन्वयक MSRLM व त्यांचे प्रतिनिधी तसेच बँक ऑफ इंडिया चे प्रतिनिधी यांचा समावेश होता.
या कार्यशाळेसाठी नितीन पाटील, सुहास काळे, दीपक साळुंके व मिलिंद जोशी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेला FPC/सह संस्था तसेच VCO यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कोकणातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या, सह संस्था तसेच VCO यांनी या योजनेसाठी प्रस्ताव सादर करुन लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी केले आहे.