खर्डेकर महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा.
वेंगुर्ला.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन वेंगुर्ला तहसीलदार व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर ओंकार ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार ओतारी साहेब यांनी मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा देत मेजर ध्यानचंद यांनी त्या वेळीच्या बिकट परिस्थितीत देखील भारताला तीन वेळा ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवून दिले यांचा आदर्श आताच्या मुलांनी घ्यावा व आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख वामन गावडे, पर्यवेक्षक डी.जी. शितोळे, सुरेंद्र चव्हाण, क्रीडा संचालक जे वाय नाईक, जिमखाना चेअरमन के.आर कांबळे व व्ही.पी देसाई, क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, हेमंत गावडे, संभाजी पाटील, माजी प्राचार्य ए.पी बांदेकर त्याचबरोबर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.