मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे संत मदर तेरेसा यांची जयंती साजरी.
वेंगुर्ला.
भारतरत्न नोबेल पुरस्कार विजेत्या संत मदर तेरेसा यांची 26 ऑगस्ट 2024 रोजी 114 वी जयंती शाळेमध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बेंजामिन डिसोजा यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.अध्यक्षांचा शाल, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मदर तेरेसा यांच्या जीवनावर आधारित सुंदर अशी नाटिका सादर केली.काही विद्यार्थ्यांनी जीवन विषयक माहिती सांगितली.मदर तेरेसा यांचे जीवन दुःखी व पीडितांची सेवा करण्यात गेले, भावी पिढीला त्यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली, सध्या समाजात त्यांच्या सेवा कार्याचा आदर्श विचार तरुण पिढीने अंगीकारला पाहिजे.
यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या संत मदर तेरेसा यांच्या जीवनकार्या विषयी सर्वांना माहिती दिली. तसेच संस्थेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डीसोजा यांनी संत मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त माहिती दिली.
यावेळी पालक शिक्षक समिती सदस्य महेश कुर्ले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहा.शिक्षिका अँन्जेलीन फर्नांडिस यांनी सर्वांचे आभार मानले.