सुंदर गाव स्पर्धेसाठी परुळेबाजार ग्रामपंचायतीचे तालुकास्तरीय मूल्यमापन.

सुंदर गाव स्पर्धेसाठी परुळेबाजार ग्रामपंचायतीचे तालुकास्तरीय मूल्यमापन.

वेंगुर्ला.
 
  आर.आर (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेसाठी परुळेबाजार ग्रामपंचायतीचे तालुका स्तरीय मुल्यमापन पंचायत समिती वैभववाडीच्या समितीने केले.या समितीत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी  रामचंद्र जंगले, लक्ष्मण हांडे यांचा समावेश होता.
   यावेळी परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभु ग्रा.प.सदस्य प्राजक्ता पाटकर, नमिता परुळेकर, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, उपस्थित होते. ग्रामसेवक शरद
शिंदे यांनी समितीला अभियान कालावधीतील माहीती दिली.
    यावेळी समितीने परुळेबाजार ग्रामपंचयतीच्या काथ्या प्रकल्प, प्लॅस्टिक संकलन, प्रक्रिया युनिट सांडपाणी प्रकल्प यांना भेट देऊन माहीती घेतली.