अभिनव प्रबोधिनी आयोजित आंबा प्रक्रिया प्रशिक्षणाची यशस्वी सांगता

कुडाळ
अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित 3 दिवसीय आंबा प्रक्रिया प्रशिक्षणाची यशस्वी सांगता करण्यात आली.कैरी आणि आंब्याचे नानाविध प्रॉडक्ट्स या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्यक्ष बनवून दाखवण्यात आले. कैरीचे कढी (आमटी), आंब्याच रायत, कैरी चॉकलेट, कैरी पोळी, कैरी जेली, कैरी लोणच, कैरी छुंदा, कैरी चटणी, कैरी पन्ह, आमचूर पावडर तसेच आंबा पोळी, जॅम, बर्फी, वडी, सरबत, आईस्क्रीम, कुल्फी, आम्रखंड, वाईन असे विविध प्रॉडक्ट्स यावेळी तयार करण्यात आले. अकोला, धुळे, पुणे, मुंबई, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून आगामी प्रशिक्षण डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी या विषयावर दि. ४ ते ६ एप्रिल तसेच फणस प्रक्रिया प्रशिक्षण १८ ते २० एप्रिल पर्यंत असणार आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी 'Training' असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवावा असे आवाहन टीम अभिनव(8767473919) तर्फे करण्यात आले आहे.