रेडी येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहत जाणाऱ्या विदेशी पर्यटकाला वाचवण्यात यश

रेडी येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहत जाणाऱ्या विदेशी पर्यटकाला वाचवण्यात यश

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला येथील रेडी यशवंतगड नजीक असणाऱ्या बिचवर एक पर्यटक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असताना  सागरी जीव रक्षक संजय गोसावी यांनी लाईफ जॅकेट च्या सहाय्याने पोहत जाऊन त्या पर्यटकाला वाचवले. हि घटना रविवारी  दुपारी ३:२० च्या सुमारास घडली. रेडी येथील बिच वर नेहमी देशी-विदेशी पर्यटक पोहण्यास येत असतात. शगुन ब्रहमला(वय २५ वर्ष) रा. दुबई बुर्ज अल हा पर्यटक गोवा हरमल येथे पर्यटनासाठी आला होता. शिरोडा वेळागर बिच वरून रेडी यशवंतगड बिच वर येण्यासाठी त्याने खाडी ओलांडण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे शगुन त्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन किनाऱ्यापासून अंदाजे ६०-७० मी. पाण्यात ओढला जाऊ लागला. त्यावेळी घटनास्थळी असणारे सागरी जीव रक्षक संजय गोसावी यांनी लाईफ जॅकेट च्या सहायाने त्या पर्यटकाचे प्राण वाचवले.