अमरावती मतदारसंघातील ६ गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार.

अमरावती मतदारसंघातील ६ गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार.

अमरावती.

   राज्यातच नाहीतर देशात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे. काही ठिकाणी लोकशाहीचा हक्क बजावला जात आहे.तर काही ठिकाणी मतदान करण्यावरच बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळतंय. याआधी उमेदवारांना मत दिलं मात्र त्यांनी मुलभूत सोयीसुविधा पुरवल्या नसल्याने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील सहा गावांनी मतदान करण्यापासून विरोध केला आहे.

या सहा गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार-

  अमरावती मतदारसंघातील मेळघाट येथील रंगबेली, कुंड,धोकडा,खामदा-किन्हीखेडा आणि खोपमार या सहा  गावांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला.आजपर्यंत आमच्या गावांना कोणतीही मुलभूत सुविधा दिली नसल्याने सहा गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. याचा फटका हा उमेदवारांना बसणार असल्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांनी हे पाऊल उचलल आहे.
   महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा सुरू आहे.राज्यात अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, वर्धा या आठ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे.दुसरीकडे अमरावतीच्या मेळघाट येथील आदिवासी भागात सहा गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, पक्के रस्ते, आरोग्य केंद्र या मुलभूत सोयीसुविधा दिल्या नसल्याने सहा गावातील ग्रामस्थांनी मतदान करण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकला आहे.एकही व्यक्ती मतदान केंद्रावर जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.