उभादांडा गावाची सुकन्या डॉ.सुखदा गवंडे हिचे एम.डी. परीक्षेत घवघवीत यश.

उभादांडा गावाची सुकन्या डॉ.सुखदा गवंडे हिचे एम.डी. परीक्षेत घवघवीत यश.

वेंगुर्ला.

     मेडिकल क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अर्थात MD Ayurveda परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील सुखदा सत्यभास गवंडे हिने या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. डॉक्टर क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या MD परिक्षेत तिने गोवा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, शिरोडा कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. सुखदा ही वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा बागायतवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री.सत्यभास भालचंद्र गवंडे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.श्वेता सत्यभास गवंडे यांची कन्या आहे.
      सुखदाने तिचे प्राथमिक शिक्षण बागायत-उभादांडा शाळा व शाळा परबवाडा नं.१ येथून तर १० वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा शाळेत घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण तिने बॅ.खर्डेकर कॉलेजमध्ये घेतले.पुढील मेडीकलचे शिक्षणं तिने गोवा विद्यापीठातून गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र शिरोडा येथे घेतले.एम.डी.आयुर्वेद 
(कायचिकित्सा) उत्तीर्ण होत तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
  सुखदा च्या या अपार मेहनतीत तिचे आई-वडील, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनुराधा बाळे, डॉ.बेसिल कार्डोजो, डॉ.मिथुन बोंद्रे यांचे मार्गदर्शन तिला लाभले.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.