वेंगुर्ला येथे १४ ऑगस्ट रोजी शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा.

वेंगुर्ला येथे १४ ऑगस्ट रोजी शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा.

वेंगुर्ला.

   भारतीय स्वातंत्र्याचा जागर करताना विद्यार्थ्यांच्या तनामनात देशभक्ती सदैव जागृत रहावी यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीमे अंतर्गत भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्या वतीने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे  आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा प्राथमिक प्रशाला आणि  माध्यमिक प्रशाला अशा दोन गटात होणार असून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त दहा संघांना प्रत्येक गटात प्रवेश दिला जाणार आहे.
   प्राथमिक गटासाठी प्रथम, द्वितीय तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये २५००, २०००, १५००, १०००, ५०० आणि प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक स्वरूप असून मोठ्या गटातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ३०००, २५००, २०००, १०००,५०० प्रत्येकी चषक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असून सहभागी सर्व संघातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता आणि नावनोंदणी साठी संजय पाटील  ( 98906 94709) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.