वेंगुर्ला-शिरोडा वाहतूक बंद असल्यामुळे एसटी सेवेच्या मार्गात बदल

वेंगुर्ला-शिरोडा वाहतूक बंद असल्यामुळे एसटी सेवेच्या मार्गात बदल

 

वेंगुर्ला


 

     वेंगुर्ला-शिरोडा या मार्गावरील वाहतूक तात्पुरती अन्य मार्गाने वळविण्यात आल्यामुळे अवजड वाहनास वेंगुर्ला-तुळस-रेल्वे स्टेशन-मळेवाड हा मार्ग देण्यात आलाय. या बदलामुळे वेंगुर्ला आगाराची शिरोडा, रेडी, आरोंदा, पणजी, वास्को या मार्गावरील बस सेवेच्या मार्गात बदल होणार आहे. अवजड वाहनांसाठी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर केल्यास धाववेळ वाढून त्याचा वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. सदरील मार्गाला पर्यायी व सद्यस्थितीत बस वाहतूक सुरू असलेल्या वेंगुर्ला-अणसुरनाका-अणसुर-फणसखोल-शिरोडा या मार्गाचा वापर केल्यास  पास धारक, व सामान्य प्रवाश्यांच्या तिकीट दरात वाढ होणार असून प्रवाश्यांनी व पास धारकांनी नवीन दरानुसार तिकीट घेऊन सहकार्य करावे अशी विनंती वेंगुर्ला आगार व्यवस्थापक यांनी केली आहे.