नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसचे भाजपकडून जंगी स्वागत.

नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसचे भाजपकडून जंगी स्वागत.

कणकवली.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड व कोल्हापूर जिल्हातील दाजीपूर, राधानगरी भागातील नागरिकांना सोयीस्कर असणारी मुंबई दादर येथून सुटणारी तुतारी एक्स्प्रेसला कोरोना काळापासून नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे गेली दोन वर्षे थांबा बंद होता.मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची भेट घेतल्यानंतर थांबा तातडीने मंजूर केल्यानतंर शुक्रवारी तुतारी एक्स्प्रेस नांदगाव येथे दाखल झाल्यानंतर जिल्हा,तालुका भाजप कार्यकर्त्यांसह त्रिमुर्ती रिक्षा संघटना, नागरीक व प्रवाशांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करून तुतारी एक्सप्रेसचे जंगी स्वागत केले.
   यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी सभापती मनोज रावराणे,भाजप कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे,त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगावचे सर्व पदाधिकारी, चालक, मालक, संतोष रावराणे,अजय रावराणे,प्रविन पन्हाळकर, मनाली गुरव,भाई मोरजकर,अनुजा रावराणे,सुनील लाड,छोटू पारकर,अमृत चौगुले,रविंद्र सावंत,दोमोदर नारकर,बाबू घाडी अशोक बोभाटे, सुनील रावराणे, अलंकार रावराणे, महेंद्र रावराणे, प्रदिप रावराणे, सचिन राणे,प्रविन सावंत, स्नेहलता नेगवे, कल्पना सावंत, रमेश तेली, अर्चना किल्ले, अनिता पवार, प्रियांका साळसकर, संदिप गुरव दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व भाजप कार्यकर्ते, नागरीक व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   यावेळी बोलताना भाजपचे कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राव राणे यांच्या प्रयत्नाने व आमदार नितेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली व देवगड तालुक्यातील प्रवासी वर्गाची होणारी गैरसोय व त्यांना नाईजास्तव कणकवली स्थानकात उतरून पडणारा आर्थिक भुर्दंड दूर झाला.त्यामुळे सर्व प्रवासी वर्गाच्या वतीने नारायण राव राणे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.
   यावेळी रेल्वे प्रवासी युवतीने केंद्रीय मंत्री नारायण राव राणे व आमदार नितेशजी राणे यांनी नांदगाव येथे तुतारीचा थांबा पुर्ववत करून आम्हा प्रवाशांची मोठी गैरसोय दूर केलीच शिवाय आर्थिक भुर्दंड व वेळेची बचत केल्याबद्दल धन्यवाद दिले.
   कोरोना काळापासून नांदगाव रोड रेल्वे स्थानकावर तुतारी एक्स्प्रेसला थांबा बंद केला होता.त्यामुळे  जिल्ह्यातील कणकवली, देवगड सह कोल्हापूर जिल्हातील दाजीपूर, राधानगदी या दोन जिल्ह्यातील प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होत होती.तर येथील रिक्षा व्यवसाय व इतर व्यवसाय पुर्णपणे कोलमडून गेला होता.
   यासाठी‌ त्रिमुर्ती रिक्षा संघटना, प्रवासी, लोकप्रतिनिधी यांच्यावतीने अनेक निवेदने आंदोलन करण्यात आली‌ होती.ही गैरसोय लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नारायण  राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नांदगाव थांबा पुर्ववत करून प्रवासी तसेच व्यावसायिक यांची गैरसोय दूर केल्याबद्दल दशक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत तसेच याबात सतत पाठपुरावा करणारे आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले.