मदर तेरेसा स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

मदर तेरेसा स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

वेंगुर्ला. 

    मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्राचे जेष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.यावेळी मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात  कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रशालेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी केली.यांनतर पहिली ते नववीच्या मुलांनी मराठी भाषेतून विविध कार्यक्रम सादर केले भाषण ,कवितावाचन, वेशभूषा, मराठी गीत सादर करून मराठीचा गौरव करण्यात आला.यामधे सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
  या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी पूजा गावडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाची माहिती सांगितली.
   यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरजींन फर्नांडिस यांनी केले तर आभार सतीश वारंग यांनी मानले.