रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा भाजपच लढणार : केंद्रिय मंत्री नारायण राणे.

मुंबई.
सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचाच, तिथे उमेदवार कोण असेल ते पक्ष ठरवेल. कुणीही लुडबूड करू नये. मी तिकीट मागितले नाही. मला न मागता भरपूर मिळालय. भाजपाचा हा मतदारसंघ आहे. भाजपाने जर माझे नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार असे थेट संकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
प्रत्येक पक्षाला बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. शिवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत? भाजपाचे जिल्हा परिषद, नगरपालिका एवढी ताकद असताना तो मतदारसंघ अजिबात सोडणार नाही. विनायक राऊत हे शिवसेनेचे आहेत का? असा सवालही नारायण राणे यांनी केला..