देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न.
देवरूख.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली देशभक्तीपर कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त या कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रा. संदीप मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे पार्श्वभूमी आणि महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी मनोगत व्यक्त करताना भारताचा मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट केला.
क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या देशभक्तीपर कथाकथन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे -
प्रथम क्रमांक- - कु. सई सुंदर नर(१२वी वाणिज्य).
द्वितीय क्रमांक- कु. तन्वी मनोहर साळुंखे(१२वी वाणिज्य).
तृतीय क्रमांक- कु. सुकन्या शंकर बागवे(११ वी वाणिज्य).
उत्तेजनार्थ- १. कु. वैभवी बबन चव्हाण (१२वी संयुक्त-वाणिज्य). २. कु. तन्वी सुरेश खांडेकर (११ वी संयुक्त-वाणिज्य).
या स्पर्धेमध्ये अन्वी प्रसादे, सानिका पांगळे, स्नेहा जेवडगी, तीर्था गुडेकर, श्रुती आग्रे, तनिष्का चव्हाण आणि सावरी शेलार यांनीही उत्तम कथा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या स्पर्धेचे परीक्षण राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. संदीप मुळ्ये यांनी मानले. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागातील सदस्यांनी मेहनत घेतली.