भारताने अफगाणिस्तानचा केला दारुण पराभव.

भारताने अफगाणिस्तानचा केला दारुण पराभव.

ब्रिजटाऊन.

   टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सुपर 8 चा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी करून अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले होते. मात्र विजयासाठी दिलेलं आव्हान पूर्ण करण्यात अफगाणिस्तान अपयशी ठरली. अफगाणिस्तानचा संपुर्ण संघ १३४ धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाचा 47 धावांनी विजय झाला आहे.
   बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सुपर 8 चा सामना पार पडला. या सामन्यापूर्वी झालेला टॉस टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीची निवड केली. तर अफगाणिस्तानला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले.टीम इंडियाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने 24, रिषभ पंतने 20, सूर्यकुमार यादवने 53, शिवम दुबेने 10, हार्दिक पंड्याने 32, धावांची कामगिरी केली.
    टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये विकेट्स गमावून 181 धावा केल्या आणि अफगाणिस्तानला 182 धावांचे आव्हान दिले होते. अफगाणिस्तानकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना अजमतुल्ला उमरझाईने सार्वधिक 26 धावा केल्या. तर इतर फलंदाजांपैकी गुलबदिन नायबने 17, नजीबुल्ला झद्रानने 19, मोहम्मद नबीने 14, नूर अहमदने 12, रहमानउल्ला गुरबाजने 11 धावांची कामगिरी केली. टीम इंडियाकडून गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवला २ विकेट्स घेण्यात यश आले. तसेच अक्षर पटेल आणि जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.