केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या कामाचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन.
वेंगुर्ला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील श्री गणेश मंदिर तेंडोली जोड रस्ता ग्रामा ६५ खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी वायंगणी गावचे सरपंच अवि दुतोंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वायंगणी गावच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच अवि दुतोंडकर यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांचे आभार मानले.
या शुभारंभ प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, उपसरपंच रविंद्र धोंड, ग्रामपंचायत सदस्य विनु मठकर, राखी धोंड, सौ.गोवेकर, सविता परब, बुथ प्रमुख हर्षद साळगावकर व बाळा धोंड, राकेश धोंड, प्रथमेश धोंड, प्रशांत सावंत, मधुकर सुर्वे, विठ्ठल सुर्वे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

konkansamwad 
