वेंगुर्ला येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड नोंदणी कॅम्‍पचे आयोजन.

वेंगुर्ला येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड नोंदणी कॅम्‍पचे आयोजन.

वेंगुर्ला.

  वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड नोंदणी करण्‍याकरीता वेंगुर्ला नगरपरिषद, ज्येष्ठ नागरीक संघटना, वेंगुर्ला तालुका पेशनर्स असोसियशन व आधार फांउडेशन सिंधुदुर्ग यांच्‍या सयुंक्‍त विद्यमानाने आयोजन केले आहे  आयोजनाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

  दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५ जि.प.शाळा दाभोसवाडा वेंगुर्ला, दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५ जि.प.शाळा नं.१ वेंगुर्ला, दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५ जि.प.शाळा नं.३ वेंगुर्ला, दि.२० फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ४ ते ५ जि.प.शाळा भटवाडी नं.२ वेंगुर्ला, दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५ शिवाजी प्रागतिक शाळा वेंगुर्ला, दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५ जि.प.शाळा नं. ४ वेंगुर्ला, दि.२३ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ४ ते ५ रोजी उपजिल्‍हा ग्रामीण रुग्‍णालय वेंगुर्ला या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.  

    तरी वेंगुर्ला शहरातील जास्‍तीत जास्‍त ज्येष्ठ नागरीकांनी आपल्‍या जवळच्‍या परिसरातील कॅम्‍पचा लाभ घेवुन  आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड काढुन घ्‍यावेत असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.